मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

थापा ऐकून ऐकून विकास वेडा झाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही गुजरातच्या दौर्‍यावर आले असता त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारावर शरसंधान केले आहे. गुजरातमध्ये विकासचे काय झाले? तो वेडा कसा झाला? असा सवाल करतानाच, थापा ऐकून ऐकून विकास वेडा झाला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या फटकेबाजीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
 
दोन दिवस पूर्वीच मोदी यांनी विकासाच्या मुद्यांवर काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. त्यावर अहमदाबाद येथील खेडा येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना राहुल यांनी भाजपवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. एखाद्या शेतकर्याला किंवा मुलाला भेटून जर मोदींनी नोटबंदीबाबत विचारले असते तर त्यांनी नोटबंदीला विरोधच केला असता, पण त्यांनी तसे केले नाही, अशी टीका त्यांनी केली. 
 
गरीब, मजूर, शेतकरी आणि आदिवासींच्या मनातील आम्ही बोलत आहोत. पण सध्याचे सरकार केवळ 10 ते 15 उद्योगपतींसाठी काम करत आहे, असे सांगतानाच, आता आम्ही आमच्या मनातले तुम्हाला सांगणार नाही, तर तुमच्या मनातले आम्ही ऐकणार आहोत, असेही ते म्हणाले.