केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली

ashok chouhan
पुणे| Last Modified सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (13:34 IST)
केंद्र सरकारने रस्ते विकासाच्या योजनांचा निधी न दिल्यामुळे राज्यातील महामार्गांची कामे खडल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने राज्यातील अनेक रस्त्यांच्या
भारंभार घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठी लागणारा निधी न दिल्यामुळे सध्याच्या घडीला अनेक रस्त्यांची कामे खोळंबल्याचे त्यांनी म्हटले.

गेल्या वर्ष-दीड वर्षात केंद्र सरकारकडून निधी येत नसल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनेक रस्त्यांची कामे थंडावली आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या कामांसाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. रसत्यांची कामे विशिष्ट कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यंनी म्हटले.
यावेळी चव्हाण यांनी खेड शिवापूरच्या आंदोलनासंदर्भातही भाष्य केले. खेड शिवापूरचारस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्ता आहे. केंद्र सरकारचा हा रस्ता टोलवर आधारीत करारानुसार तयार झाला आहे. टोल नाक्यासंदर्भात भाजपचे केंद्रींत्री गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांच्या भूमिकांमध्ये विसंगती दिसून येते. या टोल नाक्याला विरोध होता तर भाजपने या रस्त्याचे बांधकाम सुरु असतानाच आपली भूमिका मांडायला हवी होती, असे चव्हाण यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

हर्षदा स्वकूळच्या घरी युट्युबची सिल्व्हर ट्रॉफी

हर्षदा स्वकूळच्या घरी युट्युबची सिल्व्हर ट्रॉफी
हर्षदा स्वकुळ बनली प्रसिद्ध युट्युबर !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली ...

चिंताजनक, राज्यात ३१ जिल्ह्यात सरासरी ४.२ लोकांनाच शोधले ...

चिंताजनक, राज्यात ३१ जिल्ह्यात सरासरी ४.२ लोकांनाच शोधले गेले
एका कोरोना रुग्णामागे संपर्कातील किमान २० लोकांना शोधण्याच्या आदेशाचे राज्यातील कोणत्याही ...

ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण, या बाईवर तात्काळ कारवाई ...

ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण, या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी
मुंबईत एका ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपूर्णपणे ...

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा
यंदा कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपूर्णपणे वेगळ्या ...