भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा

Last Modified गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (15:39 IST)
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करायला माजी मुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात
मेगाभरती केली होती. त्याचा फायदा देखील पक्षाला झाला आणि १०० पेक्षा अधिक जागा निवडणून येत भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला होता. मात्र आता याच मेगाभरतीचं भाजपवर बुमरँग होण्याची शक्यता दिसत आहे. आता भाजपचे १२ विद्यमान आमदार आणि एक राज्यसभा खासदार सत्ताधारी महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले नेते पुन्हा पक्षात परतण्याच्या तयारीत आहेत. इतकच नाही तर भाजपामधील काही नाराज नेतेही इतर पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. या १२ आमदारांबरोबरच राज्यसभेतील एका खासदारानेही राजीनामा देऊन महाविकास आघाडीबरोबर येत पोटनिवडणुक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. या आगोदर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील अनेक नेते भाजपात येणार असे म्हंटले होते. जेव्हा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांना सरकारी निर्णयांचा फटका बसला होता. यापैकी अनेक आमदार हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधील शिक्षण सम्राट तसेच साखर कारखाना श्रेत्राशी संबंधित होते.
कोणते आमदार पक्ष सोडणार?
भाजपचे जे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे, त्यात मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील ५ आमदारांचा समावेश आहे. सोबतच आणखी ४ आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. या आमदारांची स्वत:च्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला जाण्याचीही तयारी दर्शवली आहे. राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या आमदारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपचा नाराज राज्यसभा खासदार कोण, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. त्यामुळे जर असे झाले तर भाजपाला मोठे राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

अरविंद केजरीवाल यांचे भाजपाविरुद्ध मौन बाळगण्याचे हे रहस्य ...

अरविंद केजरीवाल यांचे भाजपाविरुद्ध मौन बाळगण्याचे हे रहस्य आहे काय?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद यांचे केजरीवाल सध्या शांतता राखून आहेत. पंतप्रधान नरेंद्र ...

आव्हाड यांचा 'हा' फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड ...

आव्हाड यांचा 'हा' फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल
मुंबईतील मनीषा नगर येथील नागरिकांसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे ...

मुनगंटीवार यांचा अजित पवार यांना टोला

मुनगंटीवार यांचा अजित पवार यांना टोला
“नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण सध्याच्या परिस्थितीवर तंतोतंत खरी ठरली आहे. राज्यातील ...

घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल

घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल
सरकारकडून कोणतीही घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, असे वक्तव्य ...

राज यांची पदाधिकाऱ्यांना सुचना मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू ...

राज यांची पदाधिकाऱ्यांना सुचना मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली ...