गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (15:20 IST)

दुर्दैवी : लग्नाला काही तास उरले असताना वराचा अपघाती मृत्यू

accident in koregaon

लग्नाला काही तास उरले असतानाच वराचा ट्रॅक्टर ट्रॉलीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. गणेश विश्वासराव बर्गे (२४) असे मृत्यू झालेल्या वराचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, कोरेगाव येथील गणेश बर्गे हे बुधवारी सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. मार्केट यार्ड नजीक असलेल्या सातारा-पंढरपूर रस्त्याकडे ते गेले होते. या ठिकाणी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतानाच अचानक समोरून आलेल्या उसाच्या ट्रॉलीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने गणेश बर्गे यांचा जागीच मृत्यू झाला. बर्गे यांचा बुधवार सायंकाळी कोरेगाव येथे विवाह होणार होता.