testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबईत अँकर तरुणीची आत्महत्या

arpita tiwari
मुंबई| Last Modified बुधवार, 13 डिसेंबर 2017 (09:21 IST)
मुंबईतील मालाडमध्ये एका तरुणीने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अर्पिता तिवारी (वय २५ वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे. मृत तरुणी इव्हेंट शोमध्ये अँकरिंग करायची. मालाडच्या मालवणी परिसरात सोमवारी पहाटे ही घटना घडली.
अर्पिताने मानवस्थळ इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरील, १५०१ क्रमांकाच्या घरातून उडी घेऊन जीवन संपवलं. मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला पाहून रहिवाशांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या कृत्यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.


यावर अधिक वाचा :