testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

chagan bhujabal
Last Modified सोमवार, 18 डिसेंबर 2017 (10:07 IST)

हाराष्ट्र सदन आणि इतर गैरव्यवहारांप्रकरणी तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे. छगन भुजबळ हे राज्याचे माजी बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यामुळे विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम़

एस़
आजमी यांच्यासमोर भुजबळांच्या जामीनावर सुनावनी होणार असून, न्यायाधीश जामीन अर्जावर काय निर्णय देतात याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा समीर भुजबळ यांनी जामिनासाठी पीएमएलए कोर्ट आणि हायकोर्टाकडे अनेकदा अर्ज केले. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावले. पण, सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार पीएमएलए कायद्यातील कलम 45 (1) असंविधानिक असून, ते रद्द झाले आहे. त्यामुळे रद्द झालेल्या या कलमाचा आधार गेत भुजबळ यांनी पुन्हा एकदा न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे.
यावर अधिक वाचा :