बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (17:28 IST)

पुणे असुरक्षित : तरुणीवर बलात्कार

पुणे मुलींसाठी  असुरक्षित होत आहे की काय असे चित्र सध्या समोर येतय. यामध्ये एका रिक्षा चालकाने एका तरूणीवर अत्याचार केला असून तरूणीला त्याच्या मित्रांसोबत निर्जन स्थळी नेऊन, या मुलीवर अत्याचार केले. पोलिसांनी या घटनेची लगेच दखल घेतली आणि दोघा नराधमाना अटक केली असून एक फरार झाला आहे.
 
तरूणी आपल्या घरातील लोकांशी भांडून  घर सोडून निघून रस्त्यावर आली असताना, तिचा फायदा या  रिक्षा चालकाने तिचा फायदा घेतला.
 
पुण्यात ही दुसरी धक्कादायक घटना आहे, गुरूवारी एका अल्पवयीन मुलीच्या रस्त्यावर छेडछा़ड करून, तिला जबर मारहाण केली होती. व्हि़डीओ व्हायरल झाल्यानंतर हे समोर आले होते.
 
महाराष्ट्रातून खास शिक्षणासाठी पुणे येथे येतात. त्यात आयटी क्षेत्रासाठीही पुणे जोरात आहे. तरूण तरूणींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होतय.