शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मे 2023 (15:08 IST)

Chhatrapati Sambhaji Nagar : हृदयद्रावक, एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
Chhatrapati Sambhaji Nagar :छत्रपती संभाजी नगर येथे सातारा पोलीस ठाणा परिरात वळदगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन अत्न्ह्त्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.या सदस्यांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. मोहन प्रतापसिंग डांगर(30), पूजा मोहन डांगर(25), आणि श्रेया मोहन डांगर(5), वर्षे असे या मयताची नावे आहेत.   

मोहन डांगर आपल्या पत्नी आणि मुलगी समवेत घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती सातारा पोलीस ठाण्यात देण्यात अली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. 

मयत मोहन हे भाड्याच्या घरात राहत असून शेतीवाडी करायचे. त्यांची पत्नी पूजा हिचे सासर माहेर एकाच गावात होते त्यामुळे त्यांची मुलगी श्रेया ही दररोज आपल्या आजोळी जायची दररोज प्रमाणे श्रेया आली नाही म्हणून तिची आजी तिला बघायला मोहन यांच्या घरी आल्या  तिथे त्यांना तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थतेत आढळले. त्यांनी आरडाओरड करून शेजारच्यांनी आवाज दिला. या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविले. आहे. या कुटुंबाने असे पाऊल  का घेतले अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit