बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (09:01 IST)

निवडूक आयोग वापर करणार ‘सिटीझन ऑन पेट्रोल’ (कॉप) हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन

निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी करणार प्रयोग

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुक प्रक्रियेस  गुरुवार २ नोव्हेंबर  पासून सुरु होणार आहे. त्यामध्ये निवडणूक आयोग प्रायोगिक प्रयोग करणार आहे. यासाठी राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी निवडणुकीचा आढवा घेतला आणि इगतपुरी, त्र्यंबक नगरपालिका निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी आयोगाने तयार केलेली ‘सिटीझन ऑन पेट्रोल’ (कॉप) हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन उपयोगात आणले जाणार आहे. या दोन नगरपरिषद निवडणुकीसाठी याचा वापर केला जाणार आहे. हा देशातील पहिला प्रयोग असणार असून यशस्वी झाल्यास अ‍ॅप्लिकेशनचा वापर देशपातळीवर करण्यात येणार असे आयोगाने स्पष्ट केले आहे.  
मुख्य निवडणूक आयुक्त हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. सहारिया यांच्या उपस्थितीत इगतपुरी येथे आढावा बैठक संपन्न झाली. सहारिया म्हणाले की “ नवीन अ‍ॅपच्या माध्यमातून जनतेला लोकशाहीच्या दृष्टीने सक्षम करणयाचे काम करण्यात येणार असून, अ‍ॅपवर येणा-या प्रत्येक  तक्रारींची तातडीने नोंद आणि  दखल आयोग घेणार आहे. हे अ‍ॅप कसे वापरावे त्यासाठी निवड केलेल्या नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे  नागरिकांनी न घाबरता तक्रार केरायला हवी आणि र आदर्श निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आयोगाला मदत होणार आहे. तर त्याच बाजूला निवडणुकीनंतर स्वतंत्र संस्थेमार्फत अ‍ॅपच्या उपयुक्ततेचा अभ्यास केला जाणार आहे. निवडणुका या निर्भय वातावरणात होणे गरजेचे असून मतदान केंद्रात जाताना मतदाराला उमेदवारांची माहिती देण्यासाठी ठळक अक्षरात माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली आहे.
  • की ‘कॉप’च्या माध्यमातून येणाºया तक्रारींबाबत तक्रार करणाºयाची माहिती गुप्त असणार 
  • याचा उपयोग पाहत जागतिक परिषदेत ५३ देशांनी याचे कौतुक केले
  • देशातील निवडणुकीत प्रायोगित पद्धतीवर इगतपुरी आणि  त्र्यंबकेश्वरपासून प्रयोग केला जाणार 
  • यशस्वी ठरल्यास राष्ट्रीय  पातळीवर राबविला जाणार