Widgets Magazine

जवानाचा हवेत गोळीबार एकाचा हृद्यविकाराने मृत्यू

Last Modified गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (13:34 IST)
मालेगाव
निवृत्त शिक्षक सुरेश पंढरीनाथ काळे व निवृत फौजी देवीदास शेवाळे या दोघा शेजारच्या गेल्या काही दिवसापासून किरकोळ वाद सुरु होता.सतत होणाऱ्या किरकोळ वादाच रूपांतर आज कडाक्याच्या भांडणात झाले.या भांडणात निवृत्त फौजी देवीदास शेवाळे याने सरेश काळे यांच्या घरावर हल्ला करुण काठ्या लाठ्याने घराच्या खिड़कीच्या आणि कारच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. यात काही काल काळे यांच्या कुटुंबात दहशत माजली या दरम्यान यांच्या मुलाने हिम्मत करून कॅम्प पोलिसांना खबर दिली.पोलिस घटना स्थळी दाखल झाली तोपर्यत सुरेश काळे यांना घाबरल्या मुळे
तीव्र स्वरूपाचा ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे.यापूर्वी भांडणाची दिलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली असती तर वडिलांना जीव गमवावा लागला नसता असी नाराजी मयताचा मुलगा देवेंद्र मुलाने
व्यक्त केलीआहे.कॅम्प पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.


यावर अधिक वाचा :