Widgets Magazine
Widgets Magazine

11.44 लाख PAN रद्द: तुमचे पॅन अॅक्टिव आहे की नाही, जाणून घ्या!

बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (15:46 IST)

डुप्लीकेसी थांबवण्यासाठी भारत सरकारने11.44 लाख पॅन कार्ड्स रद्द केले आहे. ही माहिती राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी 27 जुलै रोजी संसदेत दिली होती. त्यांनी सांगितले होते की बर्‍याच लोकांनी दोन दोन पॅन कार्ड बनवले होतो, अशात ज्यांच्या नावाने एकापेक्षा जास्त पॅन कार्ड काढण्यात आले होते त्यांना रद्द केले आहे. आतापर्यंत डिएक्टिवेट करण्यात आलेल्या पॅन कार्ड्सची संख्या 11,44,211 एवढी आहे. हे तेच पॅन कार्ड आहे जे एकाच व्यक्तीला एकापेक्षा जास्त देण्यात आले होते.  
 
तुम्हाला सांगायचे म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961ची कलम 272बीच्या अंतर्गत कुठलाही व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅन कार्ड नाही ठेवू शकतो. असे केल्याने त्या व्यक्तीला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. म्हणून ज्यांच्याजवळ एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आहे त्यांनी ते परत करून द्यावे. पण या अगोदर हे तपासणे फारच गरजेचे आहे की त्या कार्ड्‍समधले कोणते कार्ड डिएक्टीवेट झालेले आहे.  
pan card
असे चेक करा आपले पॅन कार्ड
1- तुमच्या मनातील शंका दूर करायची असेल तर तुम्ही http://incometaxindiaefiling.gov.in/ वर लॉगिन करा किंवा या लिंक वर https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/KnowYourPanLinkGS.html क्लिक करा.  
 
2- आता तुमच्या समोर जे पान उघडेल त्यावर आडनाव, मिडिल नेम, फर्स्ट नेम, स्टॅटस, जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि मोबाइल नंबराची नोंद करा.  
 
3- सर्व सूचना दिेल्यानंतर सबमिट केल्यावर तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येईल. आणि कॉम्प्युटरवर तुमच्यासमोर मोबाईल पिन टाकायचे ऑप्शन येईल. या ओटीपीला तुम्ही दिलेल्या बॉक्समध्ये लिहा आणि वॅलिडेट वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एका पॅनकार्डबद्दल माहिती देण्यात येईल. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

Triumph आणि बजाज ऑटो सोबत पार्टनरशिप

बजाज ऑटोने UK ची बाईक कंपनी Triumph सोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. या पार्टनरशिपच्या ...

news

ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे हे उल्लेखनीय पाऊल

विजेचा तुटवडा आणि महागडे दर यामुळे सौर ऊर्जेचा वापर हि आता काळाची गरज बनू लागली आहे. केवळ ...

news

अर्थ मंत्रालयाकडून तब्बल 11 लाख पॅन कार्ड रद्द

अर्थ मंत्रालयाने तब्बल 11 लाख 44 हजार पॅन कार्ड म्हणजेच पर्मनंट अकाऊंट नंबर रद्द केले ...

news

'फ्रीडम टू फ्लाय' ची ऑफर, अवघ्या 799 विमान प्रवास

जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आता टाटा-एसआयए यांच्या संयुक्त ...

Widgets Magazine