गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (08:38 IST)

मुंबईच्या डबेवाल्यांचे आता कुरिअरच्या क्षेत्रात पदार्पण

मुंबईचे डबेवाल्यांनी आता कुरिअरच्या क्षेत्रातही पदार्पण केले आहे. डबेवाल्यांच्या व्यवसायातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे हा नवा शोधला आहे. 

डबेवाल्याने घरातून जेवणाचा डबा घेतल्यानंतर तीन तासांत तो डबा कार्यालयात पोहोचविण्यात येतो. याच धर्तीवर ज्या दिवशी कुरिअर घेतले त्याच दिवशी त्याची डिलीव्हरी करण्यात येणार आहे. ‘डिजिटल इंडिया’शी हातमिळवणी करीत एका कुरिअर कंपनीसाठी डबेवाले काम करणार आहेत. त्यात मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने ही सेवा कार्य करेल. त्या अ‍ॅपच्या आधारे डबेवाल्याचे लोकेशन कंपनीला व ग्राहकांना कळणार आहे. जो डबेवाला जवळ असेल त्याला त्या कुरिअरचे कॉल मिळणार आहेत. या कामी विशाल मेहता हे डबेवाल्यांना सक्रिय मदत करत आहेत. 

लवकरच मान्यवरांच्या हस्ते या अ‍ॅपचे अनावरण होईल. जे डबेवाले कुरिअर क्षेत्रात येत आहेत त्यांना दादर येथे विशेष ट्रेनिंग देण्यात येत आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या आर्थिक लाभातून ५ टक्के रक्कम गरीब, गरजू डबेवाल्यांच्या मुलांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे, मुंबईचे डबेवाले डिजिटल डबेवाले झाले आहेत. ‘डिजिटल डबावाला’ या वेबसाइटच्या माध्यमातून डबेवाले सात सेवा आॅनलाइन देत आहेत. यामध्ये एकने वाढ करून विवाह नोंदणी प्रमाणपत्रही आता डबेवाले आॅनलाइन काढून देणार आहेत. मल्हार नेचर डॉट कॉमच्या माध्यमातून मुंबईचे डबेवाले मुंबईकरांना शुद्ध, नैसर्गिक भाजी पुरवत आहेत.