देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर पातळीसोडून टीका
सावरकरांवर बोलताना शरम बाळगावी. थू… तुमच्यावर. तुमची पात्रता नाही सावरकरांवर बोलायची, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमची बोलण्याची लायकी नाही. तुमच्यावर बोलायलाही मला लाज वाटते. इंदिरा गांधी यांनी सावरकरांचा सन्मान केला. आणि तुम्ही त्यांचा अपमान करत आहेत. तुम्हाला शरम वाटली पाहिजे.
चारकोप येथे सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका केली. ते म्हणाले, सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना यातना सहन केल्या. आणि चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले सावरकरांना माफीवीर म्हणतात. तुमची लायकी तरी आहे का?, सावरकरांबद्दल बोलण्याची, अशी टीका फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. सावरकरांवर बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी जोडे मारले होते. आता रोज सावरकरांचा अपमान होत आहे. तरी उद्धव ठाकरे हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आम्ही अपमान सहन करणार नाही ही केवळ बोलले जात आहे. त्यामुळेच आम्हाला राहुल गांधी यांना जोडे मारावे लागेल. राजीव गांधी यांच्या जयंतीला तुम्ही पुष्पहार अर्पण करता. पण बाळासाहेबांच्या जयंतीला कधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी पुष्पहार अर्पण केला का?, असा सवाल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor