नागपुरात पराभव दिसू लागल्याने फडणवीसांची पुण्यात चाचपणी - रुपाली पाटील ठोंबरे
देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमध्ये पराभवाची भीती वाटत असल्यानेच ते लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचा दावा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून भाजपची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी एका पत्राद्वारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली होती.
याच मुद्द्यावरून रुपाली पाटील-ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
पाटील-ठोंबरे म्हणाल्या, "अकार्यक्षमतेमुळे भाजपाने मुख्यमंत्रिपदी नाकारलेले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे एक मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरा चेहरी उघडा पडला आहे. नागपूरमध्ये पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी करताय म्हणे?" असा प्रश्न रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.