मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मनाला चटका लावणारी घटना, आजोबांच्या दहाव्या दिवशी नातवाचा मृत्‍यू

आजोबांच्या दशक्रिया विधीच्या दरम्यान  ११ वर्षीय नातवाचा नदीत बुडून मृत्‍यू झाला आहे. जामनेर तालुक्यातील वाकी खुर्द येथे मंगळवारी सकाळी सदरची घटना घडली.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, वाकी खुर्द येथील वसंत एकनाथ बर्हाट (पाटील) यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता. यावेळी  मयंक संतोष बऱ्हाट (पाटील) (11) हा वडील संतोष बऱ्हाट (पाटील) यांच्यासोबत आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी सकाळी गावातील वाकी नदीवर आला होता. विधी सुरू असताना मुले खेळत खेळत पाण्याजवळ गेली. त्‍यांच्यासोबत मयंकही पाण्यात उतरला. यावेळी पाण्याची खोली अधिक असल्‍याने मयंक पाण्यात बुडाला. हे कळताच नातेवाईकांनी मयंकला पाण्याबाहेर काढून त्‍याला जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात  नेले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.