शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जुलै 2022 (13:42 IST)

दारुडा बायकोसाठी टॉवरवर

jalna tower
जालन्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीने आपल्या बायकोला घरी बोलण्यासाठी शोले स्टाईलची कामगिरी केली. सोडून गेलेल्या पत्नीला पुन्हा सासरच्या घरी बोलवण्यासाठी नवर्‍याने दारु पिऊन भलताच घाट घातला.
 
घरातून निघालेली पत्नी परत न आल्याने दारुडा थेट मोबाईल टॉवरवर चढला तेव्हा माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या दारूड्याला खाली येण्याची विनंती केली. मात्र तो खाली उतरण्यास तयार नव्हता. अखेर अग्निशमन दलाला पाचारण करून त्याला खाली उतरविण्यात आलं.
 
ही घटना बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे घडली.