सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (08:26 IST)

अंबाबाईच्या दर्शन वेळेत वाढ, सकाळच्या सत्राची वेळ २ तासांनी वाढवली

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील  श्री करवीर निवासिनी अंबाबाई, केदारलिंग (जोतिबा), ओढ्यावरील सिध्दीविनायक मंदिर, दत्त भिक्षालिंग या मंदिरांसह तीनहजार बेचाळीस मंदिरातील भाविकांसाठीच्या दर्शन वेळेत वाढ करण्याचा निर्णय  देवस्थान समितीने घेतला आहे. नवीन वेळेनुसार दर्शनाची सकाळच्या सत्राची वेळ २ तासांनी वाढवण्यात आली आहे. 
 
दर्शनाची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ होती. ती आता सकाळी ७ ते दुपारी १२ तर सायंकाळी ४ ते ७ करण्यात आली आहे तसेच दर्शन आता ई पासद्वारे घेता येणार असून, यासाठी देवस्थान समितीचे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर ई पास तयार होईल. या भक्तांसाठी वेगळी रांग करण्यात येणार 
असून, ही सुविधा संपूर्ण मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे आशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.