testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण : जन्मठेप की फाशी ?

कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे
स्पष्ट होणार आहे.

अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात
या खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाळ, याचे वकील शिक्षेवर युक्तीवाद करतील. त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद होईल. त्यानंतर न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींना कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी मागणी बचाव पक्षांच्या वकिलाने केली आहे. या प्रकरणातील मुख्य दोषी जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशीऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचे वकील योहान मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.


यावर अधिक वाचा :