बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

वेण्णालेक धरणाला भगदाड, जुने कपडे कोंबण्याचा प्रयत्न सुरु

साताऱ्यातील वेण्णालेक धरणाला भलमोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळे पाणी गळती थांबविण्यासाठी भगदाडात जुने कपडे कोंबण्याचा प्रयत्न रात्रीपासून सुरु आहे. त्यासाठी तब्बल दोन ट्रक जुने कपडे वापरण्यात आले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. यापूर्वीही वेण्णालेक धरणातून पाण्याची गळती सुरु होती. मात्र तेव्हा तात्पुरती डागडुजी करण्यात आली. आता पुन्हा एकदा धरणातून गळती सुरु झाली आहे.
 
पर्यटकांचं आकर्षण असलेलं आणि महाबळेश्वर, पाचगणीसह सुमारे 25 गावांना पाणी पुरवठा करणारं वेण्णा लेकला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. मात्र त्यावेळी संबंधित प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. नाही म्हणायला महाबळेश्वर गिरिस्थानच्या मुख्याधिकारी अमिता पाटील यांनी वेण्णा लेकला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. 2001 मध्ये 56 कोटी रुपये खर्चून वेण्णा लेक बांधण्यात आले आहे. तर चार वर्षापूर्वी आमदार फंडातून  तीन कोटी रुपये खर्चून या लेकची किरकोळ गळती बंद करण्यात आली होती.