रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2017 (16:55 IST)

कोपर्डी प्रकरण : प्रतिक्रिया , योग्य न्याय झाला आता शिक्षा अंमलबजवणी करा

सुप्रिया सुळे : 
कोपर्डीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी होती. त्या तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावून न्यायालयाने महाराष्ट्र आणि देशातील सर्व महिलांना न्याय दिला आहे. याबद्दल न्यायालय आणि फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी प्रयत्न करणारे वकिल श्री. उज्ज्वल निकम यांचे आभार. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, ही अपेक्षा व्यक्त करते.

 

चित्रा वाघ : 

कोपर्डीचा आजचा निकाल ऐतिहासिक आहे. १५ महिन्यांच्या लढाईला आज यश आले. या निकालामुळे राज्यातील पीडितांना, मुलींना आणि जनतेला आश्वासक दिलासा मिळाला. आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आरोपींनी दाद मागितली तरी त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी, असे मत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ  यांनी व्यक्त केले.

 

धनंजय मुंडे : 

 कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही तरीही तिन्ही आरोपींना फाशीच्या शिक्षेचा निकाल पिडीतेला आणि तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक आहे. पण हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेव्हा तिन्ही आरोपी फासावर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल.
 

नीलम गोऱ्हे 

या निकालामुळे या घटनेतील पिडीत विदयार्थिनी, तिचे कुटुंबिय व राज्यातील असंख्य पिडीत महिलांना एक आश्वासक दिलासा मिळाला आहे,  शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या नीलम गो-हे यांनीही स्वागत केले.

 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने तिन्ही  आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडित मुलीला न्याय मिळाला असून यातून कायद्याचे राज्य स्थापित होईल,  तिला परत आणता येणार नाही मात्र या नराधमांना कठोर शिक्षा मिळाली आहे. गुन्हा नोंदविण्यापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली आहे.