testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्र बंदमुळे हार्बर, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असून मेट्रोची सेवाही बंद झाली. मुंबई विद्यापीठाच्या अनेक विभागांच्या आज परीक्षा होत्या. जे विद्यार्थी ३ वाजताच्या पेपरला वेळेत पोहचू शकणार नाहीत त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
याआधी सकाळी विद्यापीठातर्फे परीक्षा रद्द होणार नसून विद्यार्थ्यांनी १ तास उशीरा पोहोचले तरी चालेल असे सांगितले होते. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने एक परीपत्रक काढले. त्यानुसार आणि आंदोलनामुळे विद्यार्थी वेळेत पोहचू शकत नसल्याने जे पोहचू शकणार नाहीत त्यांचा पेपर पुन्हा घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे बी.ए, बीएससी, बी.कॉम, बी.सीए आणि एल.एल.बी या विद्यार्थ्यांना दिलासा मिळला आहे.


यावर अधिक वाचा :