शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अवघ्या 23.7 मिनिटांमध्ये रेडिओ शस्त्रक्रिया

ट्रायजेमिनल न्यूराग्लिया या आजाराचा सामना करणा-या 83 वर्षीय रुग्णावर मुंबईत अवघ्या 23.7 मिनिटांमध्ये रेडिओ शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी वेळेत अशा प्रकारची रेडिओ शस्त्रक्रिया पार पडली.
 
पुण्याचे रहिवाशी असणारे हे आहेत इब्राहिम खान यांना  15 वर्षापूर्वी चेह-यावर वेदना सुरु झाल्या. बरेच डॉक्टर झाले, बरेच इलाज झाले पण वेदना काही कमी झाल्या नाहीत. गेल्या 3 वर्षांपासून तर चेह-याच्या डाव्या बाजूला मरणाप्राय वेदना सुरु झाल्या. चेहऱ्याला स्पर्श झाला, मान हलवली किंवा चेहऱ्यावर हास्य आणले तरी ट्रायजेमिनल न्यूराग्लिया नावाच्या आजारात वेदना सुरु होतात. इब्राहिम खान यांचेही तसंच झालं. ते तर डोक्यावर टोपीही घालत नव्हते. पण त्यांचं वय लक्षात घेता सर्जरी करणंही अवघड होते. त्यामुळं एचसीजी अपेक्स कॅन्सर सेंटरचे डॉ शंकर वंगीपुरम यांनी त्यांच्यावर शस्त्राचा वापर न करता रेडिओ सर्जरी करण्याचा निर्णय घेत ती यशस्वीही केली.