गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पिंपरी , शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017 (08:29 IST)

नगरसेवकाच्या मुलाला नोटीस

महापालिकेचे भाजप नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य लक्ष्मण धोंडू उंडे यांच्या मुलाला दिघीतील स.नं.84/2 ब मधील अनधिकृत बांधकामाबाबत दीपक लक्ष्मण उंडे यांचे नावे कलम 53 अन्वये पालिकेने नोटीस बजाविली आहे.
 
पिंपरी महापालिका हद्दीतील मौजे दिघी येथील स.नं. 84/2 ब मधील नगरसेवक लक्ष्मण धोंडू उंडे यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत पालिका निवडणूक विभागाने अहवाल मागितला आहे. तसेच संबंधित नगरसेवक उंडे यांच्या विरोधात तक्रार करुन चौकशीची मागणीही करण्यात आलेली आहे. त्यामुळे पालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने हे बांधकाम अनधिकृत असल्याने दीपक लक्ष्मण उंडे यांचे नावे कलम 53 अन्वये नोटीस बजाविण्यात आली आहे. याबाबतचा पुढील कार्यवाहीसाठी अहवाल निवडणूक विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे.