Widgets Magazine

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी

sadabhau khot
Last Modified मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:36 IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सदाभाऊंविरोधातील तक्रारींबाबत स्वाभिमानीने पक्षांतर्गत चार सदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी याबाबत पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सदाभाऊंच्या हकालपट्टीची घोषणा केली.

“सदाभाऊ यांच्या पक्षनिष्ठेवर शंका उपस्थित झाली आहे. शिवाय, त्यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे.”, असे दशरथ सावंत म्हणाले.राज्य मंत्रिमंडळातील सदाभाऊंची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. त्यामुळे सदाभाऊंनी मंत्रिपद सोडून जागा रिकामी करावी, असे आवाहन दशरथ सावंत यांनी केले आहे.



यावर अधिक वाचा :