1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नांदेड , शनिवार, 18 नोव्हेंबर 2017 (08:55 IST)

22 नोव्हेंबर रोजी संत नामदेव घुमान पंजाब दर्शनयात्रा पंजाबकडे रवाना

sant namdev maharaj
संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज यांच्या 747 व्या जन्मदिनाच्या औचित्याने नानक साई फाऊंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी काढण्यात येणारी घुमान पंजाब दर्शनयात्रा 22 नोव्हेंबर रोजी स्पेशल अमृतसर एक्‍सप्रेस’ने हिंगोली मार्गे पंजाबकडे रवाना होणार आहे. संस्थेचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी ही माहिती दिली.
 
संत नामदेव महाराज यांच्या नरसी नामदेव येथील कयाधु नदि काठावरील मंदिरात विधिवत पुजा करून यात्रेच्या शुभारंभ नारळ फोडुन करण्यात आला. 200 भक्तांचा सहभाग असलेली ही यात्रा 22 नोव्हेंबर रोजी हजुर साहिब नांदेड येथुन मार्गस्थ होणार आहे. संत नामदेव महाराज यांचा जन्मदिवस पंजाब मधील घुमान या त्यांच्या कर्म भुमित मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. त्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ही यात्रा जात असते. 24 नोव्हेंबर रोजी अमृतसर ते घुमान असे 52 किमी नगरकिर्तन काढले जाणार आहे. पंजाब हरियाणा दिल्ली येथील ऐतिहासिक गुरूद्वारे व ऐतिहासिक स्थळांना भेट देणे तथा पंजाब व महाराष्ट्र या दोन राज्यात बंधुभाव वाढावा व सामाजिक व आध्यात्मिक समन्वय अधिक मजबुत व्हावेत या हेतूने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.