testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साई चरणी 14 कोटीचे दान जमा

शिर्डी येथे 23 डिसेंबर 2017 ते 1 जानेवारी 2018 या काळात नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त सुमारे 9 लाख भक्तांनी साईदर्शन घेतले. दरम्यान, या कालावधीत सुमारे 14 कोटी 82 लाखांचे
दान साईचरणी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.
शिर्डीमध्ये 22 डिसेंबर ते 1 जानेवारी याकाळात 1 लाख भाविकांनी सशुल्क दर्शन पासेसचा लाभ घेतला. या कालावधीत रोख रकमेसह सोने-चांदी, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन, चेक-डीडी, मनीऑर्डर व परकीय चलन देणगी स्वरुपात 14 कोटी 82 लाखांचे
दान प्राप्त झाले.

यामध्ये दक्षिणा पेटीमध्ये 8 कोटी 34 लाख, देणगी काऊंटर 3 कोटी 8 लाख 29 हजार, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे 1 कोटी 27 हजार, ऑनलाईनद्वारे 64 लाख 23 हजार, चेक-डीडीद्वारे 86 लाख 12 हजार, मनीऑर्डरद्वारे 10 लाख 2 हजार रुपये, अशा देणगीचा समावेश आहे. यामध्ये 1177.170 ग्रॅम सोने व 19,955 ग्रॅम चांदीचाही समावेश आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, नेपाळ, ओमान, कुवैत, केनिया, मॉरिशस, व्हिएतनाम, थायलंड, अरब अमिरात, कतार, चीन व जपान अशा 21 देशांतील साईभक्तांनी अंदाजे 41 लाख 22 हजार रुपये किंमतीचे परकीय चलन संस्थानच्या दक्षिणा पेटीत टाकले आहे.
या कालावधीत श्री साईबाबा संस्थानच्या श्री साई प्रसादालयात 6 लाख 59 हजार 380 साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर 1 लाख 24 हजार भाविकांनी नाश्ता पाकिटाचा लाभ घेतला. या कालावधीत दर्शन रांगेमध्ये 9 लाख 14 हजार भाविकांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला असून, 5 लाख 66 हजार 900 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली आहे. त्यातून संस्थानला 1 कोटी 41 लाख 72 हजार 500 रुपये प्राप्त झाले आहेत. याकाळात श्री साईबाबा संस्थान प्रकाशित 55 हजार 432 दैनंदिनींची विक्री झाली असून, दिनदर्शिका व इतर साहित्यांद्वारे 88 लाख 40 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. लाडू, दैनंदिनी, दिनदर्शिका इत्यादींची विक्री ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर केली जात असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

येत्या ८ व ९ जानेवारीला राज्यातील सर्व अंगणवाड्या बंद

national news
केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ जाहीर केली असून राज्य शासनाकडून त्याची ...

अंशकालीन उमेदवाराची प्राधान्याने नेमणूक होणार

national news
राज्य शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयीन आस्थापनेवर बाह्ययंत्रणेद्वारे ...

भाजपच्या जुलमी राजवटीला दिलेली चपराक आहे - राज ठाकरे

national news
‘'पाच राज्‍यांच्या निवडणूक निकालाअंती भाजपला त्‍यांची जागा दाखवून दिली आहे. या बद्दल या ...

दुध पिशवीच्या बंदीला २ महिने मुदत वाढ

national news
दुधाच्या पिशव्यांवर बंदी घातली तर दूध दरवाढीचा इशारा दूध संघांनी दिला होता. या ...

युती घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू : दानवे

national news
‘शिवसेनेशी युतीसाठी चर्चा लवकरच सुरू होईल व आम्ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युती ...

भाजपच्या जुलमी राजवटीला दिलेली चपराक आहे - राज ठाकरे

national news
‘'पाच राज्‍यांच्या निवडणूक निकालाअंती भाजपला त्‍यांची जागा दाखवून दिली आहे. या बद्दल या ...

दुध पिशवीच्या बंदीला २ महिने मुदत वाढ

national news
दुधाच्या पिशव्यांवर बंदी घातली तर दूध दरवाढीचा इशारा दूध संघांनी दिला होता. या ...

युती घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू : दानवे

national news
‘शिवसेनेशी युतीसाठी चर्चा लवकरच सुरू होईल व आम्ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युती ...

उद्धव ठाकरे यांनी केले मतदारांचे अभिनंदन

national news
''नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले. पर्याय कोण या प्रश्नात गुंतून न पडता नको असलेल्यांना ...

'राष्ट्रीय लोक समता पार्टी' एनडीएतून बाहेर

national news
आता बिहारमधील 'राष्ट्रीय लोक समता पार्टी'चे नेते केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी ...