रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (10:42 IST)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप : ...म्हणून मख्यमंत्री अण्णांच्या पाया पडले

येत्या निवडणुकीपर्यंत काही बोलू नये म्हणून मुख्यमं‍त्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाया पडले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतल्यावर पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली.
 
अमरावती येथील परिवर्तन यात्रेसाठी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह पाटील हे रवाना झाले. यापूर्वी पाटील विमानतळावर पत्रकारांशी बोलले. 
 
अण्णा हजारे यांनी येत्या निवडणुकीपर्यंत काही अडचणीचे बोलू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाया पडले आणि 9 महिन्यांची मुदत मागितली, असे पाटील म्हणाले. 
 
तसेच, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कितीही टीका केली तरी भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी त्यांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न करू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.