शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (11:05 IST)

सोलापूर-पुणे इंटरसिटी चार महिन्यांसाठी रद्द

सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस १ नोव्हेंबरपासून चार महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. सोलापूर-दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी या दोन प्रवासी गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाड्या ठराविक मार्गावर धावणार आहेत.

याशिवाय पुणे-सोलापूर गाडीदेखील भिगवणपर्यंतच धावणार आहे. हैद्राबाद-पुणे एक्स्प्रेस पुण्याला न जाता कुर्डूवाडीपर्यंत धावणार आहे. तर पुणे-हैद्राबाद एक्स्प्रेसही पुण्याहून न सुटता कुर्डूवाडीपासून सुटणार आहे. अमरावती-पुणे ही आठवड्यातून दोनवेळा धावणारी गाडी संपूर्ण १२५ दिवसांच्या कालावधीत एक तास उशिरा धावणार आहे.