गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (10:59 IST)

८० टक्के पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव

एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव आढळून आला आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेत वाढ होण्याचा प्रकार भारतासह जगभरात दिसून आलेला आहे. भेसळयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्नाचे प्रमाण वाढल्यानेही ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव जाणवू लागला आहे.   आपल्या देशात व्हिटामिन कमतरता या विषयावर सर्वेक्षण केले गेले होते. तर यामध्ये धक्कदायक आकडे समोर आले असून १० पैैकी ८ पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची उणीव असल्याचे सिद्ध झाले आहे. सूर्यापासून मिळणारे जीवनसत्व असे ओळख असलेल्या  ‘ड’ जीवनसत्त्व सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्वचेमध्ये तयार होते. जीवनसत्त्वाच्या अभावामुळे खनिजांचे प्रमाण वाढून त्यामुळे हाडे ठिसूळ होऊ शकतात. त्यामुळे हाडांचे अनेक व्याधी सुद्धा जडतात तर अनेकांना चालणे मुश्कील होते. जसा डायबेटीस आपल्या देशात वाढला तसेच जीवनसत्त्वाची कमतरता आणि अभाव असलेल्या रुग्णांमध्ये भारतात वाढ होत आहे आसे समोर आहे. यामध्ये सर्वच वयातील नागरिक प्रभावित आहेत. आपल्यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असल्याबाबत सामान्यांमध्ये जनजागृती झालेली दिसून येत नाही. त्यामुळे हाडांचे दुखणे कोणत्याही वयात हलके न घेता लगेच डॉक्टर गाठले पाहिजे. त्यामुळे भविष्यातील अनेक त्रास वेळीच दूर केले जाऊ शकतात.आणि नागरिक एक चांगले आयुष्य जगू शकणार आहे.