बुधवार, 24 सप्टेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Updated : सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (14:06 IST)

कोणाला आहे श्राद्ध कर्म करण्याचा अधिकार, जाणून घ्या

When
तर्पण आणि पिंडदान केवळ वडिलांसाठी नव्हे तर संपूर्ण पूर्वजांसाठी आणि मृत परिजनांसाठी केलं जातं. संपूर्ण कुळ, कुटुंब आणि अशा लोकांना जल दिलं जातं ज्यांना जल देणारे कोणी नसेल. येथे प्रस्तुत आहे सामान्य रुपात हे श्राद्ध कोण करु शकतं. 
 
वडिलांच्या श्राद्धाचा अधिकार त्यांच्या श्रेष्ठ पुत्राला असतो परंतू ज्याला पुत्र नसेल त्यांच्या सख्खया भावाला किंवा त्यांच्या मुलाला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. कोणीच नसेल तर पत्नी देखील श्राद्ध करु शकते.
 
श्राद्धाचा हक्क मुलांना असतो परंतू मुलं नसल्यास पणतू किंवा विधवा पत्नी देखील श्राद्ध करु शकते.
 
पुत्र नसल्यास पत्नीचं श्राद्ध पती करु शकतो.
अविवाहित व्यक्तीचं श्राद्ध त्यांचा सख्खा भाऊ करु शकतो आणि ज्याला सख्खा भाऊ नसेल त्यांचं श्राद्ध त्यांचे जावई आणि मुलीचा मुलगा अर्थात नातूला करण्याचा अधिकार आहे. कुटुंबात कोणीच नसेल तर त्या व्यक्तीने ज्याला उत्तराधिकारी केलं असेल ती व्यक्ती श्राद्ध करु शकते.
 
सर्व भावंड वेगवेगळे राहत असल्यास ते आपआपल्या घरात श्राद्ध कार्य करु शकतात. तरी संयुक्त रुपाने एकच श्राद्ध करणे सर्वात श्रेष्ठ ठरेल.

ALSO READ श्राद्धात महत्वाची सामुग्री, हे सात पदार्थ नक्की असावेhttps://marathi.webdunia.com/article/shradh-paksha/important-things-needed-in-shraddha-in-pitru-paksh-120082800023_1.html
 
कोणीही उत्तराधिकारी किंवा नातू-पणतू नसल्यास कोणीही व्यक्ती श्राद्ध करु शकतं.