पितृपक्ष 2020 : श्राद्धात महत्वाची सामुग्री, हे सात पदार्थ नक्की असावे
पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते. या काळात केलेलं तरपण सरळ पितरांपर्यंत पोहचतं आणि पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे म्हटले आहे.
गंगाजल
दूध
कापड
दौहित्र
कुश
तीळ
मध
श्राद्धात तुळस देखील वापरली जाते, याने पितृ प्रसन्न राहतात अशी मान्यता आहे. श्राद्धात सोनं, चांदी, तांबा किंवा कांस्याचे पात्र किंवा पत्रावळ वापरली जाते.
श्राद्धात केळीच्या पानावर नैवेद्य वाढणे वर्जित मानले गेले आहे. श्राद्धात ब्राह्मणाला बसण्यासाठी लोखंडी आसान वापरणे वर्जित आहे. तसेच श्राद्ध किंवा तरपणमध्ये लोखंडी आणि स्टील पात्र वापरु नये.
या प्रकारे करा पिंडदान
पितरांना तरपण देण्यासाठी दूध, तीळ, कुश, फुलं, गंध इतर पाण्यात मिसळून अर्पित केल्याने पूर्वजांना तृप्त होतील. पिंडदान करुन ब्राह्मणांना भोजन करवावे. वस्त्रदान करावे. दक्षिणा द्यावी कारण दक्षिणा दिल्याविना श्राद्ध अपूर्ण मानलं जातं. दक्षिणा देण्याने श्राद्धाची पूर्ण फल प्राप्ती होते. काही शक्य नसेल तर किमान पाण्याने तरपण करावे ज्यानेकरुन पितरांना पाणी प्राप्त होतं आणि तहान भागते.
पितृपक्षाच्या शेवटल्या दिवशी सर्वपितृ अमावस्या असते ज्यादिवशी कळत-नकळत चुकत असलेलं तसेच सर्व पितराच्या नावाने श्राद्ध केलं जातं. प्रत्येक अमावस्येला तरपण करावे. रात्रीच्या काळात श्राद्ध करणे योग्य नाही.
सनातन धर्माप्रमाणे पुत्र वडिलाचं श्राद्ध करतो ज्याने त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते. पुत्र नसल्यास पत्नी श्राद्ध करु शकते. एकाहून अधिक पुत्र असल्यास ज्येष्ठ पुत्राने श्राद्धकर्म करावे.