1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Modified गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (18:22 IST)

पितृपक्ष 2020 यंदा पितृपक्ष 2 सप्टेंबर पासून सुरू, जाणून घ्या श्राद्धाचे दिवस

भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष पितृपक्ष म्हणून पाळला जातो. या पितृपंधरवडा किंवा श्राध्दपक्षाच्या काळात घरातील मृत व्यक्तींना स्मरण करुन त्यांचे श्राद्ध करण्याची पद्धत असते. 
 
श्राद्धाच्या 16 तिथी असतात. पौर्णिमा, प्रतिपदा, द्वि‍तीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या. यापैकी कोणत्याही तिथीला व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मग कृष्ण पक्षाची तिथी असो वा शुक्ल पक्षाची त्याची श्राद्ध तिथी मानली जाते. त्या तिथीला संबंधित व्यक्तीचं श्राद्ध करण्याचे विधान आहे.
 
यंदा पितृपक्ष 2 सप्टेंबर पासून सुरू होणार असून 17 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. तर जाणून घ्या कोणत्या दिवसाचं श्राद्ध कधी आहे ते-
 
2 सप्टेंबर - प्रतिपदा श्राद्ध 
3 सप्टेंबर- द्वितिया श्राद्ध 
5 सप्टेंबर- तृतीया श्राद्ध
6 सप्टेंबर- चतुर्थी श्राद्ध 
7 सप्टेंबर- पंचमी श्राद्ध
8 सप्टेंबर- षष्ठी श्राद्ध 
9 सप्टेंबर- सप्तमी श्राद्ध
10 सप्टेंबर- अष्टमी श्राद्ध 
11 सप्टेंबर- नवमी श्राद्ध
12 सप्टेंबर- दशमी श्राद्ध
13 सप्टेंबर- एकादशी श्राद्ध 
14 सप्टेंबर- द्वादशी श्राद्ध
15 सप्टेंबर- त्रयोदशी श्राद्ध
16 सप्टेंबर- चतुर्दशी श्राद्ध 
17 सप्टेंबर- सर्वपित्री अमावस्या
 
या दरम्यान शुभ कार्य किंवा नव्या कामांचा शुभारंभ करणे टाळले जाते. या पंधरा दिवसात पितरांना तरपण, पवित्र नद्यामंध्ये स्नान आणि दान याला अत्यंत महत्त्व आहे.