रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

पितृपक्षात या खाद्य पदार्थांचे सेवन टाळावे

तामसिक पदार्थ
पितृपक्षात लसूण आणि कांदा खाणे टाळावे. लसूण आणि कांदा तामसिक भोजनात सामील असल्यामुळे पितृपक्षात याचे सेवन करणे टाळावे. तर लसूण, कांदा सेवन करण्यास मनाही आहे याचा अर्थ मासाहारी पदार्थ आणि नशा करणे हे देखील वर्ज्य आहे. तामसिक पदार्थ खाल्ल्याने शरीरात उत्पन्न रसायन एकाग्रता भंग करतात म्हणून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात तामसिक भोजनास मनाही असते. अशा प्रकाराच्या भोजनामुळे मन विचलित होत असून पूजा-पाठ करण्यात मन रमत नाही. 
 
शिळे पदार्थ
या दिवसात शिळं अन्न खाऊ नाही आणि दुसर्‍यांना वाढू देखील नाही. श्राद्ध दरम्यान ताजे पदार्थ करुन ब्राह्मणाला जेवू घालावे. तसेच स्वत: देखील शिळं अन्न ग्रहण करु नये.
 
या भाज्या खाणे टाळा
बटाटे, मुळा, अरवी आणि कंद भाज्या पितरांना अपिर्त केल्या जात नाही त्यामुळे या भाज्या श्राद्धात तयार करु नये. याचं नैवेद्य दाखवू नये आणि स्वत:ही सेवन करणे टाळावे. या पदार्थांमुळे गॅसची समस्या उद्भवते किंवा यातून काही वस्तू स्वादाकडे आकर्षित करतात आणि दोन्ही परिस्थितीत मनाला शांत ठेवण्यासा समस्या येऊ शकते.
 
चणे
श्राद्धात चण्याचं सेवन कोणत्याही रुपात वर्जित आहे. चण्याने तयार कोणतेही पदार्थ या दरम्यान खाणे आणि नैवेद्य दाखवणे योग्य नाही.
 
मसूर डाळ
श्राद्धात कच्चे खाद्य पदार्थ खाणे आणि वाढणे योग्य नाही. श्राद्धात नैवेद्यासाठी इतर डाळींने तयार वड्यांचे महत्तव असले तरी कोणत्याही रुपात मसूर डाळ श्राद्धात वापरली जात नाही.
 
मोहरी
या व्यतिरिक्त मोहर्‍या, काळा जीरा, काळं मीठ हे पदार्थ देखील वर्जित आहे. पितृपक्षात जीवन शैलीचे रुप सात्विक असावे असा सल्ला दिला गेला आहे.
 
या व्यतिरिक्त पितृपक्षात पूजा करणार्‍यांनी केस कापणे, नखं कापणे, दाढी करणे, घाणेरडे कपडे परिधान करणे, शारीरिक संबंध स्थापित करणे टाळावे. तसेच सकाळ-संध्याकाळ आपल्या घरात शुद्ध तुपाचा दिवा लावून पूजा करावी ज्याने पितरांची कृपा प्राप्त होते.