मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

पंचाली भोग, पितृपक्षात या नैवेद्याचं आहे अत्यंत महत्त्व

पितृपक्षात पाच भोग लावल्याने पितरांची आत्मा तृप्त आणि प्रसन्न होऊन वंशजांना खूप स्नेह आणि आशीर्वाद देतात. जाणून घ्या या पंचाली भोगाबद्दल...
 
पितृपक्षात सर्व यथाशक्ती पितरांच्या निमित्ताने श्राद्ध कर्म करतात, परंतू या 15 दिवसात पंचबली भोग लावल्याने पितरांची आत्मा तृप्त होते असे मानले गेले आहे. शास्त्रांप्रमाणे भूतयज्ञ या माध्यमाने 5 विशेष प्राण्यांना श्राद्धाचे भोजन देण्याचा नियम आहे. या प्राण्यांना भोजन दिल्याने पितृ तृप्त होतात. 
 
विभिन्न योनींमध्ये संव्याप्त जीव चेतनेच्या तृष्टीसाठी भूतयज्ञ केलं जातं. एका मोठ्या पत्रावळीवर पाच जागी खाद्य पदार्थ विशेष करुन उडीद डाळाचे वडे आणि दही ठेवलं जातं. यांचे पाच भाग करुन गाय कुत्रा, कावळा, देवता आणि मुंग्यांना दिलं जातं. सर्वासाठी वेगवेगळं मंत्र उच्चारण करत प्रत्येक भागावर अक्षत सोडत पंचबल समर्पित केली जाते.
 
गौ बली अर्थात पहिलं नैवेद्य पवित्रतेचं प्रतीक असलेल्या गायीला खाऊ घालावं.
मंत्र- 
ॐ सौरभेय: सर्वहिता: पवित्रा: पुण्यराशय: ।
प्रतिगृह्णन्तु गोग्रासं गावस्त्रैलोक्यमातर: ।।
इदं गोभ्य: इदं न मम् ।
 
कुक्कुर बली अर्थात दुसरं नैवेद्य कत्वर्यनिष्ठेचं प्रतीक कुत्र्याला खाऊ घालावं.
मंत्र- 
ॐ द्वौ श्वानौ श्यामशबलौ, वैवस्वतकुलोद्भवौ ।। 
ताभ्यामन्नं प्रदास्यामि, स्यातामेतावहिंसकौ ॥ 
इदं श्वभ्यां इदं न मम ॥
 
काक बली अथार्त तिसरं नैवेद्य मलिनता निवारण करणार्‍या कावळ्याला खाऊ घालावं.
मंत्र- 
ॐ ऐन्द्रवारुणवायव्या याम्या वै नैर्ऋतास्तथा। 
वायसा प्रतिगृहणन्तु भूमौ पिण्डं मयोज्झितम् ॥ 
इदम् अन्नं वायसेभ्यो इदं न मम। 
 
देव बली अर्थात चौथं नैवेद्य देवत्व संवर्धक शक्तींनिमित्त गायीला खाऊ घालावं.
मंत्र- 
ॐ देवा: मनुष्या: पशवो वयांसि सिद्धा: सयक्षोरगदैत्यसङ्घा:।
प्रेता: पिशाचास्तरव: समस्ता:, ये चान्नमिच्छन्ति मया प्रदत्तम् ॥ 
इदं देवादिभ्यो इदं न मम।
 
पिपीलिकादि बली अर्थात पाचवं नैवेद्य श्रमनिष्ठा आणि सामूहिकतेचे प्रतीक म्हणून मुंग्यांना खाऊ घालावं.
मंत्र- 
ॐ पिपीलिका: कीटपतङ्गकाद्या, बुभुक्षिता: कर्मनिबन्धबद्धा:। 
तेषां हि तृप्त्यर्थमिदं मयान्नं, तेभ्यो विसृष्टं सुखिनो भवन्तु ॥ 
इदं पिपीलिकादिभ्यो इदं न मम।