शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified शुक्रवार, 3 जुलै 2020 (16:57 IST)

lunar eclipse 2020 : चंद्रग्रहणाचे 4 दान, देतील धन, सुख आणि मान-सन्मान

हिंदू धार्मिक शास्त्रांनुसार ग्रहणानंतर दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. चंद्रग्रहणावेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच क्रमात असतात, ज्यामुळे चंद्रग्रहण लागतं. ग्रहणानंतर काही विशेष वस्तूंचे दान केल्याने ग्रहणाच्या दुष्प्रभावापासून वाचता येतं. 

ग्रहणांनतर दान केल्याने अपघातापासून बचाव होतो. ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून वाचण्यासाठी दान करणे अत्यंत आवश्यक आहे.
 
4 दान
 
1. तांदूळ
तांदळाना अक्षता देखील म्हटलं जातं ज्याचा थेट चंद्राशी संबंध आहे. शुभ कार्यांत सर्वप्रथम अक्षता वापरल्या जातात. ग्रहणानंतर तांदूळ दान केल्याने घरात धन-धान्यात भरभराटी येते.
 
2. दूध
चंद्रग्रहणानंतर दुधाचे दान केल्याने देवी लक्ष्मी आणि प्रभू नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. शास्त्राप्रमाणे दुधाचे चंद्रासोबत विशेष महत्व असल्याचे मानले गेले आहे. 
 
3. साखर
साखर दान केल्याने इष्ट देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 
4. चांदी
चांदी दान करण्याचे विशेष महत्तव आहे. याने व्यक्तीला कुशाग्र बुद्धी आणि धन-वैभव संपन्न असल्याचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 
दानाचे 5 शुभ फल
मान-सन्मानात वृद्धी होते.
धनाचं आगमन होतं.
विकट समस्यांचे समाधान होतं.
सुख शांतीचं वातावरण राहतं. 
यश, बल, आणि मानसिक शक्ती प्राप्त होते.
 
8 कामाच्या गोष्टी
चंद्र ग्रहण दरम्यान आणि नंतर चंद्राशी निगडित मंत्राचे जप करावे. 
ग्रहण संपल्यावर स्नान करुन नवीन परिधान धारण केल्यावर दान करावे.
ग्रहण संपल्यावर घरात गंगाजल शिंपडून घर शुद्ध करावे.
ग्रहण संपल्यावर घरातील देवघरात पूजा करुन दान करावे.
ग्रहण संपल्यावर गायीला पोळी खाऊ घातल्याने उत्त्म फल प्राप्ती होते.
देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी ग्रहण संपल्यावर इन्द्र देवाची पूजा करण्याचे देखील विधान आहे.
घरात प्रसन्न वातावरण राहावे यासाठी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावावा.5 पांढर्‍या वस्तू मंदिरात अर्पित कराव्या.