शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

तांदळाच्या पिठाचे थालिपीठ

साहित्य : तांदळाचे पीठ एक वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बेसन दोन चमचे, खोवलेले खोबरे अर्धी वाटी, आंबट दही दोन चमचे, पाच-सहा हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर पाव वाटी , मीठ (चवीनुसार) 
कृती : 
१. ओले खोबरे, थोडी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्यात.
२.पसरट बाऊलमध्ये तांदळाचे पीठ, डाळीचे पीठ, कांदा, दही घालावे.
३. वाटून घेतलेले खोबरे, मीठ, थोडी चिरलेली कोथिंबीर आणि चमचाभर तेल घालून सगळे नीट मिसळून घ्यावे. आवश्यकता वाटल्यास अगदी थोडेसे पाणी घालावे.
४. तव्याला तेलाचा हात लावून पातळ थालिपीठ थापावे.
५. झाकण ठेवून नेहमीप्रमाणे खमंग थालिपीठ करून घ्यावे.
६. तूप, लोणचे यासह सर्व्ह' करावे.