Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

रोनाल्डो झाला चौथ्यांदा बाबा

पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो

रोनाल्डोची गर्लफ्रेंड जार्जिना रौद्रिगेजनं मुलीला जन्म दिला आहे.
रोनाल्डो
चौथ्यांदा बाबा झाला आहे. विशेष म्हणजे रोनाल्डो आणि जार्जिनानं अद्यापही लग्न केलेलं नाही. याबाबत
स्वत: रोनाल्डोनं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे.

‘अलाना मार्तिनचा आताच जन्म झाला. जियो आणि अलाना दोघीही उत्तम आहेत. आम्ही खूप खूश आहोत..’ असं ट्वीट रोनाल्डोनं केलं आहे.

मुलीच्या जन्मावेळी रोनाल्डो तिथं उपस्थित होता. त्यासाठी त्यानं आपल्या कोचची परवानगीही घेतली होती. दरम्यान, याआधी रोनाल्डो आणि जार्जिना यांना गेल्या वर्षी जून महिन्यात जुळी मुलं झाली होती. तसंच त्यांना याआधी क्रिस्टियानो ज्युनिअर हा सात वर्षाचा मुलगा देखील आहे.यावर अधिक वाचा :