प्रामिस डे स्पेशल ‘वचन’
वचन असावं असं, की जे निभवाव,
वचन असावं असं, की जे सदा जगावं,
वचन असावं असं, की जे आचराव,
वचन असावं असं, की जे डोळ्यात दिसावं,
वचन असावं असं, की जे दृढ असावं,
वचन असावं असं, की मरेपर्यंत सोबत असावं!
...नाही तर देऊ नये वचन कधीच,
विचार करावा ते द्यायच्या आधीच!!
अश्विनी थत्ते