रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (08:42 IST)

व्हॅलेंटाइन डे विशेष : टेडी डे

भावनांची चाबी आहे टेडी बियर : व्हॅलेंटाइन आठवड्यातील चवथा दिवस टेडी डे म्हणून साजरा करतात.हे दरवर्षी 10 फेब्रुवारी ला साजरा केला जातो.या दिवशी लोक आपले प्रेम आणि आपली भावना एकमेकांना सांगण्यासाठी आपल्या आवडत्या जोडीदाराला एक टेडी बियर म्हणून भेट देतात.हे एक प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम पर्याय आहे. 
जोडीदाराला टेडी भेट म्हणून दिल्याने त्याचा किंवा तिच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो.
टेडी बियर भेट देण्याचे बरेच फायदे आहे. हे आपल्या जोडीदारावर आपले किती प्रेम आहे आणि तो आपल्यासाठी किती खास आहे हे सांगायला मदत करतो. या शिवाय आपल्या अनुपस्थितीमध्ये जोडीदार जवळ असण्याच्या अनुभव देतात. बरेच लोक असे आहेत जे एकट्यात टेडीला मिठी मारतात आणि त्याच्याशी गप्पा करतात आणि प्रत्येक क्षण आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस प्रेमी जोडप्यांसाठी खास आहे. गोंडस टेडी एखाद्याच्या चेहऱ्यावर सहजच हसू आणतात.