testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बकासन

bakasan
Last Modified शनिवार, 16 जून 2018 (14:49 IST)
हे तोलात्मक आसन आहे. थोडेसे अवघड आसन असले तरी रोजच्या सरावाने व काळजीपूर्वक करून जमू
लागते. परंतु खूप घाईगडबडीने करू नये. शांत चित्ताने सराव करावा अयन्था पडण्याची शक्यता असते.

प्रथम उभे राहून कंबरेतून पुढे वाकावे. दोन्ही हाताचे तळवे पावलांसमोर जमिनीवर टेकवावेत. नंतर हळूहळू डावा गुडघा डाव्या काखेच्या व दंडाच्या आतल बाजूला टेकवावा.

हळूहळू हाताच्या तळव्यांवर पूर्ण शरीराचे वजन सांभाळून पावले वर उचलावीत व जुळवावीत. गुडघे ज्या
स्थितीमध्ये ठेवले आहेत, तसेच ठेवावेत. मान थोडीशी वरच्या दिशेला घ्यावी. हाताचे कोपरे ताठ ठेवावेत. श्वसन संथ सुरू ठेवावे. जेवढा वेळ स्थिर राहाणे शक्य आहे, तेवढा वेळ आसनस्थिती टिकवावी. आसन सोडताना सावकाश पावले जमिनील टेकवावी व हळूहळू पूर्वस्थितीत यावे.
हे थोडेसे अवघड आसन आहे. परंतु लहान मुलांच्या योगासन स्पर्धेच्या अभ्यासक्रमात याचा समावेश आहे. या आसनाच्या अभ्यासामुळे एकाग्रता वाढते. मनगट व हाताची ताकद वाढण्यास उपोगी. आत्मविश्वास
वाढण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु सुरुवातीला सराव करताना योग्य मार्गदर्शनाखालीच करावा. एकट्याने सराव करताना पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य काळजी घेऊनच सराव करावा.

योगसाधना : मनाली देव


यावर अधिक वाचा :

राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांचे निधन

national news
सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे आज सुमारे साडे नऊच्या सुमारास ...

१६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित

national news
राज्य सरकारने भरतीसाठी घोषित केलेल्या शासकीय सेवेतील ७२ हजार पदांपैकी १६ टक्के जागा मराठा ...

जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश

national news
भारतात महिला सुरक्षित नसल्‍याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन ...

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...