बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (16:12 IST)

शरीराला निरोगी ठेवतं 'ॐ' मंत्र, जाणून घ्या कशा प्रकारे करावं जप

'ॐ' मंत्राचा सतत जप केल्याने मेंदू शांत राहतं आणि आंतरिक आणि बाह्य विकारांचे निदान देखील होतं. याने अनेक शारीरिक समस्या दूर होतात आणि याचं नियमाने जप केल्याने व्यक्तीच्या प्रभामंडळात वृद्धी होते.
 
जाणून घ्या कसे करावे 'ॐ' मंत्राचा जप - 
* एखाद्या शांत जागा निवडा.
 
* जर सकाळी लवकर उठून जप केल्यास उत्तम. शक्य नसल्यास रात्री झोपण्यापूर्वी जप करावा.
 
* ॐ जप करण्यासाठी देवाच्या मूर्ती, चित्र, धूप, उदबत्ती किंवा दिव्याची गरज नसते.
 
* जर खुली जागा जसे मैदान, गच्ची, बाग नसल्यास खोलीत जप करु शकता.
 
* स्वच्छ जागेवर जमीनीवर आसन पसरवून जप करावा. पलंग किंवा सोफ्यावर बसून जप करु नये.
 
* 'ॐ' उच्चारण तेज आवाजात करावं.
 
उच्चारण संपल्यावर 2 मिनिटासाठी ध्यान करावं आणि मग उठावं.
 
* या मंत्राच्या नियमित जप केल्याने तणावापासून मुक्ती मिळते.
 
* जप दरम्यान टीव्ही, म्युझिक सिस्टम बंद असावं. जप दर्‍यान हल्ला नसावा असा प्रत्यन करावा.
 
* स्वच्छ जागेवर पद्मासनात बसा आणि डोळे बंद करुन पोटापासून आवाज काढत जोराने ॐ उच्चारण करावं. ॐ हे जितकं लांब खेचता येईल खेचावं. श्वास भरुन गेल्यावर थांबावं आणि ही प्रक्रिया पुन्हा करावी.