शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योगासन
Written By वेबदुनिया|

योगसाधना (गोमुखासन)

WD
पादो भूमौ च संस्थाप्य पृष्ठपाश्र्वे निवेशयेत।
स्थिरकायं समासाद्य गोमुख गोमुखाकृति:।।

एका पायाची टांच शिवणीला लावून दुसरा पाय त्यावरून गुडघ्यावर गुडघा येईल अशा त-हेने ठेवून शरीर साधे सरळ ठेवून बसल्यास गोमुखासद्दश्य आकृती दिसते.

गोमुख म्हणजे गाईचे तोंड या आसनांत पायाची रचना गोमुखासारखी भासते व पावले तिच्या कानाप्रमाणे वाटतातत म्हणून या आसनास गोमुखासन नाम प्राप्त झाले आहे. हठयोगप्रदीपीका व घेरंडसंहिता या दोन्ही गं्रथामध्ये या आसनाचा उल्लेख आहे.

कृती: पाय लांब करून बैठकास्थिती हळूच उजवा पाय उचलून डाव्या पायाखालून डावीकडे त्यांच्या टाच वाकवून उजव्या पायावरून उजवीकडे नेऊन त्यांची टाच नितंबास चिटकून ठेवा आता डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायावरून उजवी कडे नेऊन त्याची टाच उजव्या नितंबाला चिटकून ठेवा दोन्ही गुडघे एकमेकावर दिसतील अशी पायाची स्थिती ठेवा. डावा हात वर करा व कोप-यात वाकवून पाठमागे घ्या व डावे कोपरे डोक्यामागे वरच्या दिशेने राहील उजवा हात उजवीकडून पाठीमागे घ्या व तळहात वर सरकून दोन्ही हाताची बोटे एकमेकात बसवून घट्ट पकडा. शरीर ताठ परंतु शिथील ठेवा सावकाश डोळे मिटून घेऊन संथ श्वसन चालू ठेवत हे आसन अर्धा ते एक मिनिटापर्यंत करात येणे शक्य आहे. सरावाने जास्त वेळ देखील करणे शक्य आहे. आसन सोडताना हात सोडा मग बैठक स्थितीत या . हे आसन विरूद्ध बाजूने देखील करता येणे शक्य आहे.

लाभ: छातीच्या वरचा भाग खांदे मान दंड यांच्या स्नांयुना ताण पडून व्यायाम मिळतो व बळकटभ येते मानेचे विकार कमी होतात. पाठदुखी थांबते कुबड येऊ नये किंवा कुबड असल्यास ते कमी व्हावे म्हणून भुजंगसासनाबरोबर या आसनाचा उपयोग होतो. मन प्रसन्न होते. व ताजेतवाणे वाटते. एकाग्रता व मन:शांती करिता हे आसन उपयुक्त.

सावधान: आसन करताना अवाजवी ओढाताण करू नये त्यामुळे खांद्यास दुखापत होण्यास संभव असतो पाठीच्या मणक्याचे विकार असणा-यांणी हे आसन करू नये किंवा तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावे.