1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 मे 2021 (18:20 IST)

चविष्ट गट्ट्याचं रायतं

रायतं हे सर्वांनाच आवडतो .चवीला हे खूपच छान लागतो, प्रौढ आणि लहान मुलांना हे आवडते. रायतं बनविण्याची पद्धत जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
1 कप दही, 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ, 1/2 कप साखर, काजू, बदाम, 2 चमचे बेदाणे, 2 चमचे चारोळ्या, 1/2 चमचा जिरेपूड, चवीप्रमाणे काळ आणि पांढर मीठ.  
 
कृती -
गट्ट्याचं रायतं बनविण्यासाठी हरभराडाळीच्या पिठाचा घोळ बनवा त्यात मीठ घाला गॅस वर तेल तापत ठेवा त्यात हे घोळ घाला आणि घोळ घट्ट होई पर्यंत ढवळत रहा.थोड्या वेळाने गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड होऊ द्या. याचे लहान लहान तुकडे करा. एका भांड्यात दही आणि साखर,मीठ मिसळा हरभराडाळीचे हे गट्टे दह्यात मिसळा. या मध्ये बेदाणे, काजू, बदाम, चारोळ्या घाला. वरून जिरेपूड आणि काळ मीठ घालून सर्व्ह करा.