शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

रक्ताची निर्मिती करणारी : स्ट्रॉबेरी

ND
चवीस आंबट, किंचित गोड, जिभेची चुणचुण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व रक्ताची निर्मिती करणारी आहे. त्यामुळे अजीर्ण, मळमळ, त्यामुळे अन्नपचन न होणे अशा वेळी स्ट्रॉ चावून खावी. वर पाणी पिऊ नये. रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा ऍनिमियामध्ये लोहाच्या कल्पांबरोबर स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात.

छातीत धडधड, भीती वाटणे, आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे.

स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम, मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत. त्याने आम्लपित्त, त्वचा विकार, मूळव्याध होऊ शकते. सर्दी खोकला असतांना वापरू नये. पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये.