शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

दुधामुळे मेंदूची वाढते ताकत!

ND
शरीराची ताकत वाढवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला तर नेहमीच दिला जातो, पण बौद्धिक ताकत वाढवण्यासाठी दूध तितकेच महत्त्वाचे आहे. दुधामुळे मेंदूची क्षमता वाढते, असे आता संशोधकांनी म्हटले आहे. त्यासाठी रोज किमान एक गलास दूध प्यावे असा त्यांचा सल्ला आहे.

दुधामुळे शरीराला आवश्यक असणार्‍या पोषक तत्त्वांची पूर्तता होते. त्यामुळे आपल्याकडे दुधाला पूर्णान्न असेही म्हटले जाते. स्मरणशक्ती वाढवणे किंवा अन्य बौद्धिक कामगिरीसाठी दूध उपुयक्त आहे. दुधातील मॅग्नेशियम व अन्य घटक स्मरणशक्तीसाठी उत्तम असतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हृदयाचे विकार तसेच उच्च रक्तदाब यापासून वाचवण्यासाठीही उपुयक्त आहेत. दुधाचा नियमित सेवनाने हृदयाबरोबर मेंदूही योग्य रितीने काम करतो. माईन विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. दूध पिणार्‍या वयस्कर लोकांमध्ये अन्य वृद्धांच्या तुलनेत अधिक चांगली स्मरणशक्ती असल्याचेही त्यांना दिसून आले.