शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (09:14 IST)

वनवासा ची आवड तुजअसें का रे?

वनवासा ची आवड तुजअसें का रे?
कित्ती दा तो पुन्हा भोगशील रे!
पण आता आला तो दिन सोनेरी,
मंदीर तुझे तिथे येईल आकारी,
खूप सोसले खटले अन कोर्टकचेरी,
न्याय तुज मिळाला या भूतलावर अखेरी,
लावा दिवे, अन पणत्या शेकडो, लोकोहो,
स्वप्न पूर्ण होणार आता कित्येकांचे हो!
आली ती मंगल पावन अशी घडी,
वाजवा सनई चौघडे उभारा तुम्ही गुढी!
रामलला आता विराजा, जन्मभूमी वर,
आसुद्या आशीष तुमचे तुझ्या लेकरावर !!
 ....अश्विनी थत्ते