गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2019 (09:55 IST)

शाहरुख खानच मुलगा येतोय या चित्रपटातून मात्र वेगळ्या भूमिकेत

Twitter
बॉलीवूड सुपर स्टार असलेल्या शाहरूक खानचा मुलगा लवकरच चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. मात्र त्याची भूमिका थोडी वेगळी असणार आहे. तो त्याच्या वडलांसोबत लवकरच काम पूर्ण करणार आहे. शाहरुख आणि आर्यन हॉलिवूड मुव्ही ‘द लायन किंग’ चित्रपटासाठी डबिंग करत आहेत. मात्र याबाबत अजून दुजोरा मिळालेला नाही. शाहरुखने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलासोबत फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोघांनी भारतीय क्रिकेट संघाचे टीशर्ट घातले आहे. शाहरुखच्या टी-शर्टवर मुसाफा (लायन किंगचे नाव) आणि आर्यनच्या टी-शर्टवर सिंबा (छोठा लायन) लिहिलं आहे.पोस्टनुसार काही दिवसांपूर्वी शाहरुख आणि आर्यन मुंबईतील एका रेकॉर्डिंग स्टुडिओ बाहरे एकत्र दिसले. शाहरुख खानची पत्नी गौरीही एकदा डबिंग सेशन दरम्यान स्टुडिओमध्ये आली होती. त्यामुळे आर्यन खान हिरो नाही तर डबिंग करत हीरोला आवाज देणार आहे.