testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दिग्दर्शक कुंदन शहा यांचे निधन

Last Modified शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (17:18 IST)

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कुंदन शहा (६९) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

‘जाने भी दो यारो’ (१९८३), ‘कभी हाँ कभी ना’ (१९९३),‘क्या कहना’ (२०००), ‘दिल है तुम्हारा’ (२००२)
या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. तर टेलिव्हिजनवरील ‘नुक्कड’ (१९८६) आणि ‘वागले की दुनिया’ (१९८८) या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिकाही प्रचंड लोकप्रिय ठरल्या. ‘पी से पीएम तक’ हा २०१४ साली आलेला चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ठरला.पुण्यातील ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडिया’ (FTII) मध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. या चित्रपटाची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक कलाकृतींमध्ये केली जाते. त्यांना या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.यावर अधिक वाचा :