बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2018 (10:54 IST)

यंदा ग्रॅमी पुरस्कारांवर पुरुष कलाकारांची बाजी

अनेक  वर्षांनंतर मानाच्या साऱ्या पुरस्कारांसह पुरुष कलाकारांनी ग्रॅमी पुरस्कारांवर बाजी मारली आहे. उदयोन्मुख कलाकार म्हणून अ‍ॅलिसिया कारा हिला आणि सवरेत्कृष्ट लॅटिन अल्बम या गटासाठी शकिराला मिळालेल्या पुरस्काराव्यतिरिक्त सर्व महत्त्वाचे पुरस्कार ब्रुनो मार्स, केंड्रिक लामार आणि एड शीरन यांनी पटकावले.

यात आर अँड बी स्टार ब्रुनो मार्स याला २४ के मॅजिक अल्बमसाठी एकूण पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले. त्याला ‘अल्बम ऑफ द इयर’ व ‘रेकॉर्ड ऑफ द इयर’ हे दोन्ही सन्मान प्राप्त झाले. त्याचा हा अल्बम ग्रॅमी पुरस्कारात चोवीस कॅरेट सोन्यासारखा चमकला. मार्स याने जे झेड ४-४४, लॉर्ड हिचा मेलोड्रामा, केंड्रिक लामारचा डॅम्न तर गॅम्बिनोचा अवेकन माय लव्ह यांना मागे टाकले.

मार्स याला एकूण सात प्रवर्गात नामांकन मिळाले होते; त्यात बेस्ट इंजिनीयर्ड अल्बम या गटाचाही समावेश होता. बत्तीस वर्षांचा ब्रुनो मार्स याने वर्षांतील उत्कृष्ट गाणे, आर अ‍ॅण्ड बी उत्कृष्ट कामगिरी, हे पुरस्कार दॅटस् व्हॉट आय लाइक व २४ के मॅजिकसाठी पटकावले. त्याला उत्कृष्ट आर अ‍ॅण्ड बी अल्बम पुरस्कारही मिळाला. वर्षांतील उत्कृष्ट गाण्यासाठी लुईस फॉन्सी व डॅडी यांकी, ज्युलिया मायकेल्स, अ‍ॅलिसिया कारा व खालिद यांचीही नामांकने होती. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारात केंड्रिक लमार हा दुसरा मोठा विजेता ठरला, त्याला एलपी डॅम्न साठी बेस्ट रॅप अल्बम तर हंबल या गीतासाठी बेस्ट रॅप साँग, बेस्ट रॅप कामगिरी, उत्कृष्ट संगीत चित्रफीत हे पुरस्कार मिळाले.