रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (10:26 IST)

माधवनने घेतली ‘इंडियन रोडमास्टर’

R Madhvan

अभिनेता आर.माधवनने यंदाच्या दिवाळीत स्वत:लाच एक महागडे गिफ्ट दिले आहे. माधवनने नुकतेच ‘इंडियन रोडमास्टर’कंपनीची टूव्हीलर घेतली आहे. या अलिशान गाडीच्या एंट्रीचा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

‘इंडियन रोडमास्टर’ बाईकची सध्याची किंमत ४०.४५ लाख इतकी आहे. ‘इंडियन रोडमास्टर’ला १,८११ सीसी  थंडरस्ट्रोक १११चे इंजिन आहे. या गाडीचे वैशिष्ट म्हणजे समोरील बाजूस हँडलवर एक स्क्रीन देण्यात आली आहे. याआधी माधवनकडे बीएमडब्ल्यू के १२०० जीटीएल, डुकाटी दीवाल, यामाहा व्ही-मॅक्स अशा बाईक्सचे कलेक्शन आहे.